ठेव योजना
बचत ठेव
कोणत्याही ग्राहकाला संस्थेत बचत खाते सुरु करता येते,संस्थेत कमीत कमी 200/-रुपये भरुन खाते काढता येईल.संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत बँकेत पैसे भरणा करता येतील तसेच गरजेनुसार कामकाजाचे वेळेत काढता येतील.
मुदत ठेव योजना
ही योजना 31 दिवसांपासुन सुरु होते व तिचा जास्तीत जास्त कालावधी 60 महीन्यापर्यंत
आहे. ह्या योजनेच्या कालावधीनुसार त्याचा व्याजदर ठरविणेत आलेला आहे. ह्या मुदतीचा गुतवणुकीचा कालावधी पुर्ण होउुन गेल्यावर संस्थेचे ग्राहक कधीही आला, तरी मुदत संपलेचे दिनांकापासुनच नुतनिकरण केले जाते.
ह्या योजनेच्या असणाऱ्या प्रचलित व्याजदरात ज्येष्ठ नागरीकांना (साठ वर्ष पुर्ण)अर्धा टक्का जादा व्याज दिले जाते.
आवर्त ठेव योजना
ही योजना एक वर्ष, दोन वर्ष, तिन वर्ष, चार वर्ष व पाच वर्ष या कालावधी करीता आहे. सदर योजनेसाठी अधिकृत एजंट नेमले आहेत, त्यामुळे गुंतवणुकदारांना घरबसल्या या योजनेचा लाभ घेता येतो.
मासिक प्राप्ती ठेव योजना
निवृत्तीधारक ठेवीदारांमध्ये ही योजना जास्त लोकप्रिय असून या योजनेचा कालावधी 25
महीने ते 5 वर्ष असा आहे. या याजनेचे ठेवीवरील व्याज दरमहा बचत खाती वर्ग केले जाते शिवाय व्याजाची पुनर्गुंतवणूकसुध्दा आवर्त ठेव योजनेत करता येते.मात्र या योजनेला बचत खाते असणे अनिवार्य आहे.
या योजनेत देखील जेष्ठ नागरीकांना (साठ वर्ष पुर्ण )अर्धा टक्का जादा व्याज दिले जाते.
पिग्मी ठेव योजना
संस्थेची सर्वात लोकप्रिय अशी ठेव योजना असून संस्थेच्या सर्व शाखेतील तालुक्यातील जवळपास 15 गावांमध्ये,संस्थेच्या 6 एजंटद्ववारे संपर्क करुन खातेदारांमार्फत रोजच्या रोज 1,50,000/- ते 2,00,000/- जमा होतात.
या योजनेमध्ये किमान 10/- भरुन खातेदार खाते सरु करु शकतो. दररोज ती रक्कम एजंटमार्फत जमा केली जाते.
ठेव योजना
मुदत ठेव
- 31 दिवस ते 90 दिवस – 6%
- 91 दिवस ते 180 दिवस – 7%
- 181 दिवस ते 12 महीने – 8%
- 1 वर्ष ते 5 वर्ष – 10%
आवर्त ठेव
- 1 वर्ष – 8%
- 2 वर्ष – 9%
- 3 वर्ष – 9%
- 4 वर्ष – 10%
मासिक प्राप्ती ठेव योजना (पेन्शन योजना )
25 महीने 60 महीने – 10%
(ज्येष्ठ नागरीकांना मासिक प्राप्ती व मुदत ठेव योजनेत अर्धा टक्का जास्त व्याजदर)
अधिक माहितीकरिता आमच्या नजीकच्या शाखेशी त्वरीत संपर्क करा.