संस्थेबद्दल माहिती
एप्रिल 1995
पतसंस्थेची संकल्पना
श्री.अच्युत विष्णु जोशी सोा. रा.खेड .ता.खेड (कुवारसाई) खेडच्या पंचायत समिती कार्यालयामधुन सप्टेंबर 1994 अखेर स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर ते त्यांचे गावातील बागेत काम पाहु लागले.ते कामावर असताना हे काम श्री.आबा जोशी सोा. पहात होते.
सन 1995 च्या एप्रिल महीन्यात श्री.आबा जोशी सोा.याचे रक्कम रु.30,000/-चे कर्ज प्रकरण एका पतसंस्थेने नाकारले त्यावेळी श्री.अच्युत जोशी सोा.हे काही कामानिम्मीत त्यांचे दुकानात होते. त्यांना श्री.आबा जोशी सोा. यांनी कागदपत्रे दाखविल्यावर त्यांच्या मनात एक विचार येऊन गेला की, आजच्या बाजार क्षेत्रासारख्या ठिकाणी ज्याची तीस लाखाच्या आसपास रक्कमेची वास्तु आहे त्याच्याबदृल अशा प्रकारे वागणुक असेल तर अगदी सामान्य माणसाची काय गथा असु शकते लगेच श्री.आबा जोशी सोा.यांना एवढे फक्त बोलले आणी नेहेमी प्रमाणे क्षणात उठुन ते कामाला लागले, की आपण पतसंस्था सुरु करुया श्री.आबा जोशी सोा. यानी आवश्यकती सर्व कागदपत्रांची पुर्तता करून श्री.अच्युत जोशी सोा.यांचेजवळ ठेवत म्हणाले की, आपल्याला 250 सभासद करणेचे लक्ष देणेत आले आहे.आणी मग श्री.आबा जोशी सोा. व श्री.अच्युत जोशी सोा.यानी याकरीता पावती पुस्तके छपाई करून सभासद करुन घेणे करीता आपल्या सहकार्यांसोबत सुरुवात केली. त्यांचे एका फेरीतच 257 सभासद पुर्ण झाले. त्यामुळे त्यांचा ऐवढा आत्मविश्वास वाढला की, आपण पतसंस्थेच्या उभारणीत नक्कीच यशस्वी होऊ.
एप्रिल 1996
संस्था कार्यालयाचे उद्घाटन
अशाप्रकारे प्राथमिक सर्व योग्य ती पूर्तता होऊन दि. 01/02/1996 रोजी रजिस्टर नोंदणीचे त्यांना कळविणेत आले.अता पतसंस्थेच्या कामकाज सुरु करण्याचे दृष्टीने हालचाली सुरु केल्या. सर्वप्रथम डॉ.श्री.प्रकाश नेने यांनी त्यांचे दवाखान्याशेजारील एक खोली काही दिवसाकरीता देण्याचे मान्य केले त्या ठिकाणी 20/03/1996 चैत्र शु.प्रतिपदेच्या दिवशी संस्था कार्यालयाचे उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यापूर्वी संचालक म्हणुन 11 सभासदांची देण्यात आलेल्या नावाप्रमाणे मुख्य प्रवर्तक म्हणुन श्री.परशुराम राजाराम जोशी ऊर्फ आबा जोशी सोा.यांचे नाव दाखल करणेत आले.व पहील्या सभेचे अध्यक्ष म्हणुन श्री.अच्युत विष्णु जोशी सोा.यांची निवड करणेत आली.या सर्व कागदपत्रांच्या कामामध्ये श्री.मळेकर (गटसचिव)यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या ठिकाणी ऑक्टोंबर 1996 पर्यंत संस्थेचे कामकाज चालु होते
नोव्हेंबर 1996
श्री लक्ष्मी नारायण मंदिरातील आवारात स्थलांतर
त्यानंतर नोव्हेंबर 1996 पासुन श्री लक्ष्मीनारायण मदीराचे आवारातील इमारतीत कामकाज सुरु होऊ लागले. डॉ.श्री.नेने यांनी कोणतेही भाडे त्यावेळी स्विकारलेले नाही.
2004
पतसंस्थेची स्वतःची जागा
2004 मध्ये खेड शहरातील असणा-या पतसंस्थांमध्ये आपली श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्था ही पहील्यांदा पतसंस्थेची स्वतःची जागेत स्थलांतरीत झाली. या इमारतीचे सर्व श्रेय संस्थेचे संस्थापक विदयमान संचालक श्री.परशुराम राजाराम जोशी ऊर्फ आबा जोशी सोा.यांना त्याच बरोबर संस्थेच्या सर्व सभासदांना जाते. श्री.परशुराम राजाराम जोशी ऊर्फ आबा यांनी स्वतःची इमारतीमधील 860 स्के.फुट इमला अतिशय अल्प दरांने संस्थेला दिला.त्याच बरोबर संस्थेच्या सर्व सभासदांनी शेअर्स वरील लाभांश इमारतीच्या निधी करीता दिला. संस्थेने या इमारतीत स्थलांतराच्या वेळी या सर्व विषयांचे तोल मोल करुन मुख्य प्रर्वतक,पहीले अध्यक्ष,पहीला सभासद,पहीला ठेविदार तसेच पहीला कर्जदार व कर्मचारी यांना अॅड.श्री.दिपक पटवर्धन यांचे हस्ते सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले.
ऑक्टॉबर 2016
जिल्हा कार्यक्षेत्र
19/10/2016 रोजी संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारात वाढ होऊन संस्थेला जिल्हा कार्यक्षेत्र मिळाले
2017
स्वमालकीची दुमजली स्वतंत्र इमारत
सन 2017 मध्ये संस्थेने पुन्हा एकदा स्वमालकीच्या दुमजली स्वतंत्र इमारत खरेदी केली असुन संस्था आज येथे कार्यरत आहे.
जानेवारी 2018
नवीन शाखा प्रस्तावित
दिनांक 25/01/2018रोजी संस्थेच्या नविन शाखा मु.पो.खोपी ता.खेड,मु.घाणेखुंट पो.कोतवली ता.खेड व मु.पो.वेळणेश्वर ता.गुहागर यांना मंजुरी मिळाली.
मे 2018
खोपी शाखेचा शुभारंभ
दिनांक 22/05/2018 रोजी खोपी शाखेचा शुभारंभ
सप्टेंबर 2018
घाणेखुंट शाखेचा शुभारंभ
जानेवारी 2019
वेळणेश्वर शाखेचा शुभारंभ
दिनांक 20/01/2019 रोजी वेळणेश्वर शाखेचा शुभारंभ करणेत आला.आज रोजी खेड येथील प्रधान कार्यालयातील शाखेसह संस्थेच्या एकुण चार शाखा कार्यान्वीत आहेत.
वरील विवेचनाप्रमाणे सभासदांचे हितचिंतकांचे तसेच मान्यवरांचे अत्यंत मोलाचे सहकार्य पतसंस्थेला झालेले आहे. सुरुवातीपासुन आत्ता पर्यंत पतसंस्थेला विनयशील कर्मचारी वर्ग लाभलेला आहे. संस्थेचे सभासद, ठेविदार, हितचिंतक, मार्गदर्शक, संस्थेचे आजी माजी संचालक मंडळ या सर्वांच्या सहकार्याने आज पतसंस्थेने गरुडभरारी घेतली असुन भविष्यात या सर्वांच्या साथीने लावलेले छोटेसे रोपटयाचा आता फांदया फुटू लागल्या असुन, वटवृक्षाच्या दिशेने नेण्याचा मानस आहे.